ब्रेकिंगमहाराष्ट्र
पॉक्सो व बलात्कार प्रकरणात मोठा निकाल; कळंब न्यायालयाकडून आरोपी अजित शेळके यांची निर्दोष मुक्तता
डीएनए अहवालासह वैद्यकीय पुरावे निष्फळ; बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य

0
7
6
4
8
6
पॉक्सो व बलात्कार प्रकरणात मोठा निकाल; कळंब न्यायालयाकडून आरोपी अजित शेळके यांची निर्दोष मुक्तता
डीएनए अहवालासह वैद्यकीय पुरावे निष्फळ; बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य
कळंब : जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब यांनी पॉक्सो व बलात्कार प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी अजित शेळके यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.राजेभोसले यांनी हा निकाल दिला.शिरढोण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्रमांक ७६/२०२३ नुसार भारतीय दंड विधान कलम ३७६(३),३७६(२)(एन),३७६(२)(जे) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत चार आरोपींविरुद्ध अल्पवयीन पीडितेवरील अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला क्रमांक १४८/२०२३ नुसार जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब येथे चालला.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने पीडिता, तिचे आई-वडील, वैद्यकीय अधिकारी, डीएनए तपासणी अधिकारी, पोलीस कर्मचारी, फॉरेन्सिक विभाग अधिकारी, पंच साक्षीदार, तपास अधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.आरोपी क्रमांक ३ अजित शेळके यांच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा सखोल उलटतपास केला. बचाव पक्षाने मांडलेल्या युक्तिवादात आरोपीवर खोटे व मोघम स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.तसेच फिर्यादीतील कथित घटना नेमकी कधी व कुठे घडली याबाबत स्पष्टता नसल्याचे, पीडितेने आरडाओरडा का केला नाही, तसेच आरोपी व पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले.डीएनए तपासणी अहवालातही आरोपी क्रमांक ३ विरुद्ध कोणताही निष्कर्ष सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. सरकार पक्षाचे कोणतेही साक्षीदार फितूर नसतानाही बचाव पक्षाने प्रभावी बाजू मांडल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी अजित शेळके यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली.या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड.मंजुषा साखरे,ॲड.महेश लोहार,ॲड.शुभम तांबे,ॲड. अमित गोळे, ॲड.अर्चना कांबळे, ॲड.भाग्यश्री जगदाळे (तुळजापूर),ॲड. योगेश कुलकर्णी,ॲड.ओंकार कोरेगावकर,ॲड.संकेत गोरे, ॲड.रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.
0
7
6
4
8
6



