ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तामलवाडी पोलिस ठाणे हद्दीत तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0
7
6
4
9
7
तामलवाडी पोलिस ठाणे हद्दीत तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर | प्रतिनिधी
तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत एका २९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) हिला दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास याच परिसरातील एका तरुणाने दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर तिला आडरानात घेऊन जात किचनसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.या घटनेबाबत पीडितेने दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास तामलवाडी पोलीस करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
0
7
6
4
9
7



