Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

महाद्वारासमोर भाविकेचे पाकीट चोरीस; दोन महिला संशयितांना तात्काळ अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0 7 6 5 0 5

महाद्वारासमोर भाविकेचे पाकीट चोरीस; दोन महिला संशयितांना तात्काळ अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर | प्रतिनिधी

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकेचे पाकीट चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन महिला संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चेंबूर, मुंबई येथील संजोता बाळासाहेब बेडक्याळे या महिला भाविकेने पोलिस चौकीत येऊन तक्रार दिली की, महाद्वारासमोर दर्शनाच्या रांगेत असताना त्यांचे पाकीट चोरीस गेले असून त्यामध्ये सोने व रोख रक्कम होती. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई चैतन्य सगरे (ब.नं. ९८५) यांनी तात्काळ मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

फुटेजमध्ये दोन संशयित महिलांचे हालचाली संशयास्पद दिसून आल्याने फिर्यादीसह मंदिर परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. दरम्यान मातंगी मंदिराच्या बाजूला संबंधित दोन महिला आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकीत चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.

संशयितांकडून २.५ तोळे (अंदाजे किंमत ३ लाख रुपये) वजनाचे सोन्याचे मिनी गंठण व कानातील टॉप तसेच ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. पुढील कारवाईसाठी तुळजापूर पोलीस ठाण्याची गाडी बोलावून फिर्यादीसह आरोपी व मुद्देमाल तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे स्नेहा हिरामण सुकळे व निलाबाई शिवराम शिंदे (रा. राशीन, ता. करमाळा, जि. अहिल्यानगर) अशी आहेत. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे