तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले; प्रभाग ७ मधून माजी नगरसेवक अंबरिश जाधव यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले!
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले!
प्रभाग ७ मधून माजी नगरसेवक अंबरिश जाधव यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वर्तुळात चैतन्य संचारले आहे. आरक्षण सोडती जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ७ जवाहर गल्ली, कमान वेस, पंढरपूर गल्ली या मतदारसंघातून माजी नगरसेवक अंबरिश जाधव यांनी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

२०१५-१६ या कार्यकाळात नगरसेवक म्हणून कार्यरत असताना अंबरिश जाधव यांनी प्रभागातील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळेच आजही त्यांच्याविषयी जनतेत आपुलकी व विश्वास कायम आहे.

युवानेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात प्रभाग ७ मधील मतदारसंघात अंबरिश जाधव यांची जनसंपर्क मोहीम जोरदार गतीने सुरू आहे. घराघरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात त्यांची पुन्हा दमदार एन्ट्री निश्चित मानली जात आहे.

जनतेशी थेट संवाद, प्रभागातील प्रश्नांवर नेमकी भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे अंबरिश जाधव यांचे नाव पुन्हा एकदा “जनतेचा नगरसेवक” म्हणून पुढे येत आहे.प्रभाग क्रमांक ७ : ना.मा.प्र. (महिला), सर्वसाधारण




