ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुरक्षा रक्षकच बनले भक्षक! पोलीस कर्मचाऱ्यावर विवाहित महिलेला फूस लावून पळविल्याचा आरोप
सुरक्षा रक्षकच बनले भक्षक! पोलीस कर्मचाऱ्यावर विवाहित महिलेला फूस लावून पळविल्याचा आरोप

0
7
6
4
8
6
सुरक्षा रक्षकच बनले भक्षक! पोलीस कर्मचाऱ्यावर विवाहित महिलेला फूस लावून पळविल्याचा आरोप
तुळजापूर : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस यंत्रणेतूनच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गावातील एका लेकुरवाळ्या विवाहित महिलेला फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत संबंधित महिलेच्या पतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.तक्रारीनुसार, तुळजापूर पोलीस कर्मचारी यांनी तक्रारदाराच्या पत्नीशी जवळीक साधून अनैतिक संबंध निर्माण केले. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार बाहेरगावी असताना त्याच्या पत्नीला आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्यामाहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी वारंवार त्यांच्या घरी येत होता. या दरम्यान दोघांमध्ये संबंध वाढले. याबाबत अनेक वेळा समज देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. उलट पत्नीला पैशांचे आमिष दाखवून व स्वतः पोलीस असल्याचा धाक दाखवत तिला पतीपासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या घटनेत मुलीचे शाळेतून टी.सी. काढणे, घरातील महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जाणे आणि सतत फोनवर संपर्क ठेवणे या बाबी संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच “मी पोलीस आहे, माझे कोणी काही करू शकत नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.दरम्यान, या प्रकारामुळे संबंधित कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, तक्रारदाराने स्वतःच्या जीवितास धोका असल्याचे सांगत तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार तसेच स्थानिक पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.या गंभीर आरोपांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून सत्य समोर आणावे, अशी मागणी तक्रारदारातून होत आहे.
“तुळजापूरमध्ये अवैध मटका-जुगाराच्या हफ्ता वसुलीमुळे कायद्याचे रक्षकच मूक बनले असून, याच पैशांच्या सावलीत पोलीस यंत्रणेत आसुरी वृत्तीला खतपाणी मिळत असल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे.”
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके,तुळजापूर.
0
7
6
4
8
6



