Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर आगाराचा अभिनव उपक्रम — ‘देवाची गाडी’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रेरणेतून धार्मिक पर्यटन सेवांना नवा वेग..

0 7 6 4 8 6

तुळजापूर आगाराचा अभिनव उपक्रम — ‘देवाची गाडी’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रेरणेतून धार्मिक पर्यटन सेवांना नवा वेग..

तुळजापूर : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगाराकडून श्रद्धाळूंकरिता सुरू करण्यात आलेली ‘देवाची गाडी’ ही बससेवा सध्या भाविकांच्या मोठ्या पसंतीस उतरली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून आणि संवेदनशील दृष्टीकोनातून ही नवी धार्मिक सेवा सुरू करण्यात आली असून, ग्रामीण भागातील हजारो भक्तांसाठी ती आशीर्वाद ठरत आहे.

‘देवाची गाडी’ ही तुळजाभवानी, विठ्ठल-पंढरी, महालक्ष्मी आणि बाळूमामा या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारी विशेष एसटी सेवा आहे. तुळजापूर येथून दररोज सकाळी नऊ वाजता सुटणारी ही बस पंढरपूर, कोल्हापूर मार्गे आदमापुरला सायंकाळी पोहोचते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातला परतीचा प्रवास सुरू करते. त्यामुळे भक्तांना एका प्रवासात चार देवस्थानांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ मुरगूड बसस्थानकावर ज्येष्ठ वाहतूक नियंत्रक शशी लिमकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात स्थानिक मान्यवर, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुळजापूर आगारप्रमुखांनी सांगितले की,ही सेवा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. भाविकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असून, लवकरच आणखी धार्मिक मार्गांवर अशाच फेऱ्या सुरू करण्याचा विचार आहे.

धार्मिक पर्यटनाला चालना देत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘देवाची गाडी’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना घालून दिला आहे. भाविकांच्या सोयीसाठी एसटी विभागाने उचललेले हे पाऊल म्हणजेच “भक्तांच्या सेवेत सरकार” या धोरणाचा प्रभावी प्रत्यय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

2/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे