ब्रेकिंगमहाराष्ट्र
लग्नाचे आमिष दाखवून ३१ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; धाराशिव शहरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सहा महिन्यांहून अधिक काळ शोषणाचा आरोप; पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांची कारवाई

0
7
6
5
0
5
लग्नाचे आमिष दाखवून ३१ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; धाराशिव शहरपोलीस ठाण्यात गुन्हा दाख
सहा महिन्यांहून अधिक काळ शोषणाचा आरोप; पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांची कारवाई
धाराशिव : धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे लग्नाचे खोटे आमिष दाखवून ३१ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ ऑगस्ट २०२५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी तरुणाने संबंधित महिलेला विवाहाचे आश्वासन देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर पीडितेने दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.पीडितेच्या प्रथम खबरीवरून भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) व ६९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0
7
6
5
0
5



