ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूरमध्ये “उमेद मॉल” उभारण्याची मागणी; मंत्र्यांकडून सकारात्मक संकेत

0
7
6
4
8
7
तुळजापूरमध्ये “उमेद मॉल” उभारण्याची मागणी; मंत्र्यांकडून सकारात्मक संकेत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महिला बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत, दर्जेदार आणि स्थिर बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य सरकारतर्फे ‘उमेद मॉल’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रारंभी राज्यातील दहा जिल्ह्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्येही ‘उमेद मॉल’ उभारण्याची मागणी आज विधानसभेत जोरदारपणे मांडण्यात आली.
आई तुळजाभवानीचे पवित्र मंदिर असलेल्या तुळजापूरात वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा ठिकाणी ‘उमेद मॉल’ उभारल्यास महिला बचत गटांना स्थिर विक्री दालन मिळून त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकता येईल, असा ठाम विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
या संदर्भातील प्रश्नाला राज्याचे मंत्री मा. जयकुमारजी गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासक उत्तर दिले. तुळजापूरसाठी ही अत्यंत आनंददायी आणि महिला बचत गटांसाठी संधीचे नवे द्वार उघडणारी बाब ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक महिला गटांमध्येही या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली असून, तुळजापूरात ‘उमेद मॉल’ उभारणीसाठी आता सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
0
7
6
4
8
7



