Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरात दुचाकी चोरीचा वाढता धुमाकूळ;तब्बल 1 लाख 10 हजार रुपयाच्या दोन मोटारसायकल गायब

गर्दीचा फायदा घेत सोन्याचे मिनीगंठण लंपास;महिलेची १ लाख रुपयांची फसवणूक; तुळजापूरात पुन्हा चोरीचा प्रकार 

0 7 6 4 8 7

तुळजापूरात दुचाकी चोरीचा वाढता धुमाकूळ;तब्बल 1 लाख 10 हजार रुपयाच्या दोन मोटारसायकल गायब

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर-धाराशिव रोडवरील पार्किंगजवळून दोन दुचाकी चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उमेश बिभीषण कदम (वय 37, रा. ढेकरी ता. तुळजापूर) यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दि. 06 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 7.00 ते 9.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने उमेश कदम यांची युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. MH-25 BB 3343) व राम लक्ष्मण जिंगोणी (वय 52, रा. साकत पिंपरी) यांची हिरो मोटारसायकल (क्र. MH-13 EV 4225) अशा दोन गाड्या एकूण 1,10,000 रुपयांच्या किंमतीच्या चोरून नेल्या.

या घटनेवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

गर्दीचा फायदा घेत सोन्याचे मिनीगंठण लंपास;महिलेची १ लाख रुपयांची फसवणूक; तुळजापूरात पुन्हा चोरीचा प्रकार

तुळजापूर : प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी दर्शनानंतर गणपती मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गळ्यातले चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

महादेवी शिवाजी पठाणशेट्टी (वय 34, रा. हाउस नं.159 विजय नगर कॉलनी, आळण चेकपोस्ट, कलबुर्गी) या दि. 07 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 9.15 वाजता दर्शन आटोपून सुवर्णश्वर गणपती मंदिराजवळून जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनीगंठण (किंमत अंदाजे ₹1,00,000) असे चोरून नेले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे