ब्रेकिंगमहाराष्ट्र
वेळापूरात शिवसेनेची संघटनात्मक बैठक; BLA बळकटीकरणावर भर, दत्ता मगरांच्या कामाची उदय सामंतांकडून दखल
“संघटन मजबूत, बूथ सक्षम आणि विकासाचा वेग कायम ठेवत शिवसेना अधिक प्रभावी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.”

0
7
6
4
8
6
वेळापूरात शिवसेनेची संघटनात्मक बैठक; BLA बळकटीकरणावर भर, दत्ता मगरांच्या कामाची उदय सामंतांकडून दखल
वेळापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या BLA (बूथ लेव्हल एजंट) संदर्भातील महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे यांनी BLA संघटन बळकटीकरण, पक्षाची कार्यपद्धती आणि आगामी राजकीय नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बूथ स्तरावरील संघटना सक्षम केल्याशिवाय पक्षाची ताकद वाढू शकत नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना पक्ष विस्तार, विकासकामांना गती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, माळशिरस पंचायत समितीचे नूतन सभापती दत्ता भैय्या मगर यांच्या विकासाभिमुख कामकाजाची विशेष दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे कौतुक केले. तालुक्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी अभिनंदन केले.
या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार ज्योतीताई वाघमारे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माढा लोकसभा प्रमुख चंद्रहार पाटील, जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे, दादासाहेब लवटे, जिल्हाप्रमुख आरती बसवंती, संजय विभुते, सतीश सपकाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
7
6
4
8
6



