ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव ग्रामीणमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोन्या-चांदीसह २.४४ लाखांचा ऐवज लंपास
धाराशिव ग्रामीणमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोन्या-चांदीसह २.४४ लाखांचा ऐवज लंपास

0
7
6
4
8
6
धाराशिव ग्रामीणमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोन्या-चांदीसह २.४४ लाखांचा ऐवज लंपास
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु. येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असा तब्बल २ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी फिर्यादी सुजीत हाणुमंत गाटे (वय ३२, रा. सारोळा बु., ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १.०० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी व साक्षीदार यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा मौल्यवान माल चोरून नेण्यात आला.सकाळी घरफोडीचा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत.सारोळा बु. परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.
0
7
6
4
8
6



