Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

महिलांच्या मतांनी ठरवली सत्ता! बाळासाहेब भोसले ठरले गेमचेंजर, विनोद गंगणे नगराध्यक्ष

भोसले यांचे नियोजन, बहिणींचा विश्वास आणि गंगणेंची सत्ता; तुळजापूरात ऐतिहासिक निकाल!

0 6 7 8 4 1

महिलांच्या मतांनी ठरवली सत्ता! बाळासाहेब भोसले ठरले गेमचेंजर, विनोद गंगणे नगराध्यक्ष

भोसले यांचे नियोजन, बहिणींचा विश्वास आणि गंगणेंची सत्ता; तुळजापूरात ऐतिहासिक निकाल!

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत शासनाने अनिवार्य केलेल्या eKYC प्रक्रियेच्या निमित्ताने तुळजापूर शहरात उसळलेली महिलांची अभूतपूर्व गर्दी ही केवळ प्रशासकीय गरज न राहता राजकीय दिशादर्शक ठरली. शहरात मोफत eKYC शिबिरांचे जाळे उभारत या उपक्रमाला जनआंदोलनाचे स्वरूप देणारे सुशांत उर्फे बाळासाहेब भोसले हे महिलांसाठी एकमेव आकर्षण ठरले.तुळजापूरमधील कोणतीही पात्र महिला eKYC पासून वंचित राहू नये,या ठाम भूमिकेतून भोसले यांनी राबवलेल्या उपक्रमाला लाडक्या बहिणींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अद्याप eKYC न केलेल्या महिलांसाठी सोपी प्रक्रिया, मार्गदर्शन आणि मोफत सुविधा देत भोसले यांनी विश्वासाचा धागा घट्ट केला -आणि हाच विश्वास मतपेटीतून कौल बनून बाहेर आला.त्याच लाडक्या बहिणींनी नगराध्यक्षपदाच्या लढतीत उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी निवडून देत शहराच्या सत्तेचा किल्ला भक्कम केला. विनोद उर्फ पिंटू गंगणे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड ही केवळ विजय नव्हे, तर महिला मतदारांच्या संघटित शक्तीचा स्पष्ट संदेश ठरला. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे दिवाळी भेट देणारे विनोद पिटू गंगणे यांच्याकडे यंदा लाडक्या बहिणींनी थेट ‘नगराध्यक्षपदाची भेट’ दिली! हा विजय कृतज्ञतेचा, विश्वासाचा आणि सेवाकार्याचा स्फोटक प्रत्यय देणारा आहे. भोसले यांच्या नियोजनबद्ध सामाजिक हस्तक्षेपातून उभा राहिलेला हा कौल आणि गंगणे यांचा निर्णायक विजय – याने तुळजापूरच्या राजकारणात लाडक्या बहिणींचाच एकमेव आकर्षण असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.आज तुळजापूर सांगत आहे.सेवेला मत,विश्वासाला सत्ता!

निवडणूक जवळ येताच आठवण होणारे चेहरे जनतेनं ओळखले; रोज भेटणाऱ्या माणसालाच सत्ता दिली.विरोधक फक्त टीका करण्यात व्यस्त होते;आम्ही लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर काम केलं, आणि जनतेनं त्याचं उत्तर मतपेटीतून विजय करून दिलं.

सुशांत उर्फे बाळासाहेब भोसले, तुळजापूर.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे