Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

बनावट दस्तऐवजांचे खेळ खडकीत फसले; सहा आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल !

बनावट दस्तऐवजांचे खेळ खडकीत फसले; सहा आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल !

0 7 6 5 0 5

खोटे मुखत्यारपत्र, संशयास्पद खरेदीखत! सह-दुय्यम निबंधकांच्या तत्परतेने गुन्हा उघड

बनावट दस्तऐवजांचे खेळ खडकीत फसले; सहा आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

खडकी शिवारात बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड
पॅरालिस झालेल्या वृद्ध मालकाचा फायदा घेऊन जमीन बळकावण्याचा प्रयत्न; सह-दुय्यम निबंधकांच्या तत्पर कारवाईने कट उधळला

तुळजापूर तालुक्यातील खडकी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे २ हेक्टर ८५ आर जमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गट क्रमांक ४१, क्षेत्र ०२ हेक्टर ८५ आर ही दिक्षीत कुटुंबाची मालकीची जमीन अत्यंत संगनमताने काबीज करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार नांदेड येथील व्यापारी गिरीष दिक्षीत यांनी ३ नोव्हेंबर रोजी तुळजापूर पोलिस ठाणे आणि सह दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल केली होती.

या तक्रारीत दिल्ली, सोलापूर, धाराशिव आणि स्थानिक गावातील अशा एकूण सहा जणांचा समावेश आहे.

▪️वृद्ध, आजारी जमीनमालकाचा गैरफायदा

तक्रारदार गिरीष दिक्षीत हे नांदेडच्या हडको परिसरात वास्तव्यास असून व्यापार व्यवसाय करतात. खडकी शिवारातील वडिलोपार्जित जमीन त्यांच्या वडिलांच्या — अशोक गणपतराव दिक्षीत — यांच्या नावावर नोंद आहे. वयाच्या पुढील टप्प्यात असलेल्या अशोक दिक्षीत यांना अर्धांगवायू व इतर आजारांमुळे हालचाल करणे अशक्य असून मजुरामार्फत जमीन कसली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याच परिस्थितीचा फायदा घेत अजयकुमार यादव (रा. दिल्ली), झोपू लक्ष्मण राठोड (रा. खडकी), अय्यूब राजन पटेल (रा. बोरामणी), संदीप नवनाथ पाटील (रा. मुळेगाव तांडा), नितीन शाम भंडारी (रा. खडकी) व शिवाजी अंबादास जवान (रा. खडकी) यांनी संगनमत करून जमीन बळकावण्याचा कट रचला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

▪️मृत व्यक्तीच्या नावावर आधारकार्ड तयार करून खोटे मुखत्यारपत्र!

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दिक्षीत यांच्या आजी यमुनाबाई दिक्षीत या २००५ सालीच निधन पावल्या, तरीदेखील त्यांच्या नावाने बनावट आधारकार्डासह इतर कागदपत्रे तयार करण्यात आली.हीच खोटी कागदपत्रे वापरून ३० जून २०२५ रोजी अजयकुमार यादव यांच्या नावावर खोटे कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारीत आहे.

▪️संशयास्पद खरेदीखत नोंद; महसूल फेरफार प्रक्रियेत उघड झाला प्रकार

या बनावट मुखत्यारपत्राच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी तुळजापूर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक ५४२१/२०२५ असा संशयास्पद खरेदीखत नोंदवण्यात आला. फेरफार प्रक्रियेदरम्यान संशय बळावल्याने दिक्षीत यांनी तलाठी कार्यालयात आक्षेप नोंदवला. तपासणी केल्यानंतर संपूर्ण व्यवहार बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती त्यांनी दिली.

▪️तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल – सह दुय्यम निबंधकांची निर्णायक भूमिका

सह दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय, तुळजापूर येथे कार्यरत बालाजी ग्यानोबा मादसवार यांना व्यवहारातील संशयास्पद बाबींची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ दखल घेत पडताळणी केली. दस्तऐवजांतील गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर मादसवार यांनीच फिर्याद नोंदवून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर तुळजापूर पोलिस ठाण्यात कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पॅरालिस झालेल्या वृद्ध मालकाचा फायदा घेऊन जमीन बळकवण्याचा प्रयत्न – अखेर फसला

वृद्ध आणि पॅरालिस झालेल्या व्यक्तीच्या असमर्थतेचा गैरफायदा घेत जमीन बळकावण्याचा घोर प्रयत्न सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. तपास सुरू असून आरोपींवर पुढील कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे