Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी तुळजापूर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान”

0 7 6 4 9 7

प्रजासत्ताक दिनी तुळजापूर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस स्टेशन तुळजापूर येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सिद्धेश्वर ब्लड बँक, सोलापूर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले.
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशास अनुसरून आयोजित या शिबिरात पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच तुळजापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सकाळपासूनच पोलीस ठाण्याच्या परिसरात रक्तदात्यांची गर्दी दिसून येत होती. देशसेवेबरोबरच समाजसेवेचा आदर्श ठेवत पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान केल्यामुळे नागरिकांमध्येही प्रेरणा निर्माण झाली.या शिबिरात पोलीस स्टेशन तुळजापूर येथील अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड जवान, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील नागरिकांनी रक्तदान करून समाजोपयोगी कार्यात योगदान दिले. सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने पार पाडली. रक्तदानापूर्वी आरोग्य तपासणी करूनच रक्तसंकलन करण्यात आले.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदायी रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलिसांनी समाजाशी असलेली आपली नाळ अधिक घट्ट केल्याचे चित्र यावेळी दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सर्व रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्या सिद्धेश्वर ब्लड बँकच्या टीमचे आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांतून पोलीस व जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे