Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड;स्थायी समितीचीही स्थापना; विनोद गंगणे सभापती

तुळजापूर नगरपरिषदेच्या विषय समित्या व स्थायी समितीची निवड;विशेष सभेत सभापती व सदस्यांवर एकमताने शिक्कामोर्तब

0 7 6 5 0 5

तुळजापूर नगरपरिषदेच्या विषय समित्या व स्थायी समितीची निवड;विशेष सभेत सभापती व सदस्यांवर एकमताने शिक्कामोर्तब

स्थायी समितीचीही स्थापना; विनोद उर्फे पिटू गंगणे सभापती

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषदेच्या विषय समित्या व स्थायी समितीच्या रचनेसाठी रविवारी (दि. २५) सकाळी ९.४५ वाजता विशेष सभा पार पडली. मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ अंतर्गत आयोजित या सभेत पाच विषय समित्या व स्थायी समितीवरील सभापती व सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली.सदर सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नगरपरिषद धाराशिवच्या मुख्याधिकारी श्रीमती निता अंधारे उपस्थित होत्या. यावेळी तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अजिंक्य रणदिवे यांनी सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. सभेस नगरपरिषदेचे सर्व २४ सदस्य उपस्थित होते.सभेत सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, महिला व बालकल्याण तसेच शिक्षण अशा पाच विषय समित्यांची रचना करण्यात आली. प्रत्येक समितीत पाच सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. उपाध्यक्ष हे सार्वजनिक बांधकाम समितीचे पदसिद्ध सभापती असतील, असा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.संख्याबळानुसार भारतीय जनता पार्टीने प्रत्येक विषय समितीवर चार, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक सदस्य नामनिर्देशित केला.सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्री. रोचकरी रामचंद्र सुखदेव यांची निवड झाली असून इतर सदस्यांमध्ये श्री. जगदाळे पंडितराव, श्री. पेंदे लखन, श्री. कदम औदुंबर व श्री. इंगळे रणजित यांचा समावेश आहे.
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी डॉ. कदम अनुजा अजित यांची निवड झाली आहे.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी श्री. कदम सागर विलास यांची निवड करण्यात आली.महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. सावंत ज्योती अनंत, तर उपसभापतीपदी सौ. अमृतराव सरोजा नरेश यांची निवड झाली.शिक्षण समितीच्या सभापतीपदी सौ. क्षिरसागर निता दिनेश यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमाच्या कलम ६६ अन्वये विषय समित्यांचे सर्व सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतील. नगराध्यक्ष श्री. विनोद (पिटु) विलासराव गंगणे हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतील. स्थायी समितीत एकूण सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सभेच्या शेवटी इतिवृत्त वाचन करून सर्व सदस्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले व सर्वानुमते इतिवृत्त मंजूर करण्यात आले. संपूर्ण सभेचे चित्रीकरण करण्यात आले असून पिठासीन अधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे