ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजाभवानी मंदिरात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी
तुळजाभवानी मंदिरात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी
0
7
6
4
8
7
तुळजाभवानी मंदिरात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेला गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी पल्लवी दत्तु अंधारे (वय ३०, रा. केज, जि. बीड) या दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. दर्शन करून त्या होमाजवळ आल्यावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे, सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या घटनेबाबत पल्लवी अंधारे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी भा.दं.वि. कलम ३०३ (२)अन्वये (चोरीचा गुन्हा) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलिसांकडून सुरू आहे.
0
7
6
4
8
7



