Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

औदुंबर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जनसमर्थनाची दणदणीत रीघ निवडणुकीतील ‘विजयाचा संकेत’ वाढदिवस सोहळ्यातूनच स्पष्ट! आगामी निवडणुकीतील “विजयाचा मजबूत इशारा”

आगामी निवडणुकीतील “विजयाचा मजबूत इशारा”

0 7 6 5 0 6

औदुंबर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जनसमर्थनाची दणदणीत रीघ
निवडणुकीतील ‘विजयाचा संकेत’ वाढदिवस सोहळ्यातूनच स्पष्ट!

आगामी निवडणुकीतील “विजयाचा मजबूत इशारा”

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन उमेदवारी जाहीर होताच लोकाभिमुख कामांची छाप पाडणारे माजी नगरसेवक औदुंबर कदम यांच्या वाढदिवसाला काल प्रचंड उत्साहात जनसमुदायाची उपस्थिती पाहायला मिळाली. सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय असलेल्या कदम यांना विविध स्तरातून आलेल्या शुभेच्छांचा वर्षाव हा निवडणुकीतील त्यांच्यावरील वाढत्या लोकविश्वासाचा द्योतक ठरला आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या संदेशात औदुंबर कदम म्हणाले,“काल माझ्या वाढदिवसानिमित्त वेळ काढून प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. माझ्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात ज्यांनी पाठिशी उभे राहिले त्या प्रत्येकाचे मी ऋणी आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू दे.”

गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग २ मधील जनतेचा कल कदम यांच्या बाजूने अधिक ठळकपणे दिसून आला. भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या प्रचंड संख्येमुळे वाढदिवसाचा सोहळा क्षणभर जनआशीर्वाद सभेचे स्वरूप धारण करताना दिसला.

राजकीय चर्चेतही वाढदिवस सोहळ्यातील गर्दी हा आगामी निवडणुकीतील “विजयाचा मजबूत इशारा” म्हणून पाहिला जात आहे. अनेकांनी दिलेल्या समर्थनपर शुभेच्छांतून कदम यांच्या नावावरचा विश्वास आणखी दृढ झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रभागातील विकासकामांची सातत्याने केलेली धडपड, सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांचा आधार यामुळे औदुंबर कदम यांची उमेदवारी अधिक बळकट होत असून, वाढदिवसाच्या निमित्ताने उमटलेली जनसमर्थनाची लाट त्यांच्या निवडणूक मोहिमेला नवी गती देणारी ठरली आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे