ब्रेकिंगमहाराष्ट्र
शिवराज्याभिषेक दिन तुळजाभवानी मंदिरात साजरा करा; छावा संघटनेची मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तुळजाभवानी मातेसमवेत अभिषेक करण्याची विनंती; तुळजापूरात नव्या चर्चेला उधाण !

0
7
6
4
8
6
शिवराज्याभिषेक दिन तुळजाभवानी मंदिरात साजरा करा; छावा संघटनेची मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तुळजाभवानी मातेसमवेत अभिषेक करण्याची विनंती; तुळजापूरात नव्या चर्चेला उधाण !
तुळजापूर | छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात विशेष सोहळा आयोजित करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसील कार्यालय तुळजापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा मराठा सेवक (संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील) रविंद्र ज्ञानोबा साळुंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे. या निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेसोबत महाराजांच्या पुतळ्यासही अभिषेक करण्यात यावा.तसेच हा सोहळा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, विश्वस्त मंडळ, उपविभागीय अधिकारी, आमदार, नगराध्यक्ष, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, महंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांचे ऐतिहासिक व आध्यात्मिक नाते संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुळजापूर येथे असा विशेष धार्मिक सोहळा आयोजित झाल्यास तो शिवभक्तांसाठी मोठा प्रेरणादायी क्षण ठरेल, अशी भावना शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.दरम्यान, या मागणीवर शासन व मंदिर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे तुळजापूरसह राज्यातील शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.
0
7
6
4
8
6



