Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मंगरूळ गटात खोपडे दाम्पत्याच्या उमेदवारीने राजकीय वातावरण तापले जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासाचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचा निर्धार

0 7 6 4 8 7

मंगरूळ गटात खोपडे दाम्पत्याच्या उमेदवारीने राजकीय वातावरण तापले
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासाचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचा निर्धार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

मंगरूळ जिल्हा परिषद गट क्रमांक ३८ मध्ये निवडणूक वातावरण दिवसेंदिवस रंगत चालले असून, माधुरी विपिन खोपडे यांच्या उमेदवारीने गटात नवी राजकीय हालचाल निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या गटातून विपिन शिवाजी खोपडे यांनी सक्रियपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर, मंगरूळ गटातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. गावोगावी नागरिकांचा वाढता पाठिंबा, सभा–भेटींमधून मिळणारा प्रतिसाद आणि लोकांचा कौल स्पष्टपणे खोपडे दाम्पत्याच्या बाजूने झुकताना दिसत आहे.विपिन खोपडे हे अभ्यासू, अनुभवी आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक न्याय, शेतकरी हित, युवकांना रोजगार संधी, पाणीपुरवठा सुधारणा, रस्ते विकास तसेच आरोग्य सुविधांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची गटात वेगळी ओळख आहे.स्थानिक सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि युवकांच्या सतत संपर्कात राहून त्यांनी अनेक विकास प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यामुळेच मंगरूळ गटात विकासाचा बालेकिल्ला कायम ठेवू असा निर्धार जनतेतून व्यक्त होत आहे.दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने माधुरी विपिन खोपडे या अत्यंत योग्य उमेदवार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. विकासाच्या अजेंड्यावर आधारित प्रचाराला आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.खोपडे दाम्पत्याच्या उमेदवारीमुळे मंगरूळ गटात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी निवडणुकीत हा गट लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे