Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मगर गंगणेला गगन दाखवणार का? की गंगणे मगरला आसमान दाखवणार? तरुण पिढीचा विचार करून नगराध्यक्ष निवडा – ऋषिकेश मगर

तरुण पिढीचा विचार करून नगराध्यक्ष निवडा – ऋषिकेश मगर

0 7 6 4 9 7

मगर गंगणेला गगन दाखवणार का? की गंगणे मगरला आसमान दाखवणार ?

तरुण पिढीचा विचार करून नगराध्यक्ष निवडा – ऋषिकेश मगर

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची तापलेली रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नगराध्यक्षपदाची लढत आता अक्षरशः दुरंगी महाभिडत झाली आहे. भाजपचे विनोद उर्फ पिंटू गंगणे आणि महाविकास आघाडीचे अमर मगर यांच्यातील हा सामना तुळजापूरकरांच्या विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

शहरभर फिरत असलेल्या राजकीय समीकरणांच्या वाऱ्यांसह आरोप-प्रत्यारोप, सभांची लगबग, कार्यकर्त्यांची धावपळ आणि रणनीतींचा सतत बदल यातून वातावरण तापलेलेच आहे.

गेल्या १५ वर्षांपासून तुळजापूर नगरपरिषदेत गंगणे यांची मजबूत पकड असल्याने त्यांचे समर्थक त्यांनाच पुन्हा सत्तेच्या गादीवर बसविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची ठाम साथ मिळत असल्याने भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो.

तर दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर हेही मागे नाहीत. खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार कैलास पाटील यांचा सक्रिय पाठींबा मिळाल्याने आघाडीचा प्रचार अधिक आक्रमक झाला आहे.

दोन्हीही बाजूंना वजनदार नेतृत्वाचे विशाल छत्र असल्याने ही लढत अधिकच चुरशीची ठरली आहे. शहरातील प्रत्येक गल्ली-बोळात फक्त एकच चर्चा “मगर गंगणेला गगन दाखवणार का? की गंगणे मगरला आसमान दाखवणार?” या प्रश्नाचे उत्तर मतपेट्या उघडल्यावर ३ नोव्हेंबरला मिळणार आहे.

दरम्यान, दोन्हीही उमेदवारांची प्रचारयंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. घरोघरी भेटी, लहानमोठ्या सभा, तरुण मतदारांशी संवाद, महिलांशी संवाद अशा कार्यक्रमांना वेग आला आहे.

याच पार्श्वभूमीवर तरुणाईच्या मतांची किल्ली आपल्या हाती खेचण्यासाठी प्रयत्न अपार सुरू असून“मतदारांनी तरुण पिढीचा विचार करून नगराध्यक्ष निवडावा,”असे आवाहन शिवसेना युवा नेते ऋषिकेश मगर यांनी केले आहे.

तुळजापूरच्या राजकीय रंगभूमीवरील या दुरंगी लढतीचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे, तसतशी मतदारांच्या उत्सुकतेची पराकाष्ठा गाठली आहे. नेमके कोणावर जनतेचा विश्वास बसेल, हे पाहण्यासाठी संपूर्ण शहराचा श्वास रोखला आहे.

विनोद उर्फ पिंटू गंगणे (भाजप)

“तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी गेली १५ वर्षे मी अहोरात्र काम केले आहे. शहराचा प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. जलव्यवस्था, रस्ते, स्वच्छता आणि सुविधा यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले, तेच जनतेसमोर आहेत. तुळजापूरच्या भावी पिढीसाठी अधिक मोठी कामे समोर आहेत. ही प्रगतीची वाटचाल थांबू नये म्हणून जनता पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवेल, याची मला खात्री आहे.”

अमर मगर – महाविकास आघाडी

“तुळजापूरला बदलाची गरज आहे. नागरिकांचा आवाज ऐकणारे, तरुणांना संधी देणारे आणि सर्वसमावेशक नेतृत्व शहराला हवे आहे. गेल्या अनेक वर्षांत विकासाचे आश्वासनच मिळाले, प्रत्यक्षात मात्र जनता अडचणींना सामोरी गेली. आम्ही नव्या ऊर्जेसह, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद ठेवणाऱ्या प्रशासनाची हमी देतो. तुळजापूरकरांनी बदलासाठी इतिहास घडवण्याची वेळ आता आली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे