Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

भीक मागो आंदोलनात छावा संघटनेचा सरकारला इशारा;दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्या नाहीतर मंत्रालयावर रुमणे मोर्चा ?

भीक मागो आंदोलनात छावा संघटनेचा सरकारला इशारा;दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्या नाहीतर मंत्रालयावर रुमणे मोर्चा ?

0 6 7 8 4 1

भीक मागो आंदोलनात छावा संघटनेचा सरकारला इशारा;दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्या नाहीतर मंत्रालयावर रुमणे मोर्चा ?

कळंब : प्रतिनिधी

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना,कळंब तर्फे तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या “शेतकऱ्यांसाठी भीक मागो आंदोलनाला” दि.११ ऑक्टोंबर रोजी तिसरा दिवस पूर्ण झाला. या आंदोलन स्थळी छावा मराठा युवा संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांनी भेट देत युती सरकारला इशारा दिला की, “खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे; अन्यथा छावा संघटना मंत्रालयावर रुमणे मोर्चा काढण्यात येणार,”असा इशारा देण्यात आला आहे.

राजाभाऊ साळुंके पुढे म्हणाले की, “राज्य व केंद्र सरकारने जीएसटीद्वारे गोळा केलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले हे स्पष्ट करावे. सरकारकडे निधी नाही म्हणून शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसेल तर आम्ही भीक मागूनसुद्धा सरकारला पैसे पुरवू,”असा टोला त्यांनी लगावला.

मराठवाड्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेत सरकारला धारेवर धरावे,अशी मागणीही त्यांनी केली.आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सरकारच्या तिजोरीसाठी प्रतीकात्मकरीत्या ५ व १० रुपयांची नाणी गोळा करून ती प्रांताधिकारी यांच्या हस्ते शासनाला जमा केली.

 

या आंदोलनात छावा मराठवाडा महिला अध्यक्ष देवकन्या जावळे, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, शिवशंभू प्रतिष्ठानचे हनुमंत घाडगे, धाराशिव शहर उपाध्यक्ष अमोल मोरे, संपर्क प्रमुख लहू शिंदे, कळंब शहर अध्यक्ष अमर गायकवाड, तसेच मोठ्या संख्येने छावा कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते. राजाभाऊ साळुंके यांच्या या इशाऱ्यामुळे शेतकरी प्रश्नांवर पुन्हा एकदा सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे