ब्रेकिंगमहाराष्ट्र
चैत्री पौर्णिमा यात्रेत आरोग्य विभाग सतर्क; मंदिर परिसरातील पाण्याची ओ.टी. टेस्ट
चैत्री पौर्णिमा यात्रेत आरोग्य विभाग सतर्क; मंदिर परिसरातील पाण्याची ओ.टी. टेस्ट

0
7
6
4
8
7
चैत्री पौर्णिमा यात्रेत आरोग्य विभाग सतर्क; मंदिर परिसरातील पाण्याची ओ.टी. टेस्ट
तुळजापूर : आई तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहीम राबवली आहे. महाद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाण्याची ओ.टी. टेस्ट करून गुणवत्ता तपासण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य निरीक्षक काशीद एम. बी. व आरोग्य कर्मचारी पवार ए. डी. यांनी ही तपासणी केली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजार पसरू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिर परिसरातील विविध हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाण्याचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये समाधान हॉटेल, काळे स्वीट मार्ट ,चिंतामणी हॉटेल तसेच उदय हॉटेल येथील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांची ओ.टी. टेस्ट करण्यात आली. पाण्याची शुद्धता, क्लोरीनचे प्रमाण व स्वच्छता यांची बारकाईने पाहणी करण्यात आली.
यात्रा काळात लाखो भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येत असल्याने आरोग्य विभागाकडून कोणतीही ढिलाई न करता सातत्याने तपासण्या सुरू आहेत. तसेच हॉटेल चालक व व्यावसायिकांना स्वच्छतेचे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असून, पिण्याचे स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
0
7
6
4
8
7





