गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बहुचर्चित चित्रा पाटील हत्याकांड : आरोपी ओम निकम यांना जामीन
बहुचर्चित चित्रा पाटील हत्याकांड : आरोपी ओम निकम यांना जामीन

0
6
7
8
4
1
बहुचर्चित चित्रा पाटील हत्याकांड : आरोपी ओम निकम यांना जामीन
धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील बहुचर्चित चित्रा ताई पाटील हत्याकांडातील संशयित आरोपी ओम निकम यांना धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. अमोल वरुडकर यांनी केलेला सखोल व मुद्देसूद युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत हा दिलासादायक निर्णय दिला.
न्यायालयात युक्तिवाद करताना ॲड. वरुडकर यांनी आरोपीविरोधात थेट, ठोस व निर्णायक पुराव्यांचा अभाव असल्याचे अधोरेखित केले. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले पुरावे संशयापलीकडे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात अपुरे ठरत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. अटकेपासून आरोपी ओम निकम हा न्यायालयीन कोठडीत होता.
फिर्यादी संग्राम पाटील यांच्या तक्रारीनुसार, ते व त्यांची आई चित्रा ताई पाटील एकत्र राहत होते. चित्रा ताई नेहमी सोन्याचे दागिने परिधान करत असत. शेजारी राहणारा २१ वर्षीय ओम निकम त्यांच्याकडे ये-जा करत असून लग्नाविषयी बोलत असल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. १८ जुलै रोजी चित्रा ताई बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी ओम निकम याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुळजापूर पोलिस ठाण्याचे तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी तपास केला. मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केल्याने या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
0
6
7
8
4
1



