तुळजापूर नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात; तिरंगी लढतीची चिन्हे!
नगरसेवक पदासाठी तब्बल ६३ उमेदवारांचे नशीब दि. २ डिसेंबरला मतपेटीत
तुळजापूर नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात; तिरंगी लढतीची चिन्हे!

नगरसेवक २३ जागेसाठी तब्बल ६३ उमेदवारांचे नशीब दि. २ डिसेंबरला मतपेटीत
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपालिका निवडणूक २०२५ चा राजकीय ताफा शिगेला पोहोचला आहे. उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस संपताच नगराध्यक्ष पदाचा अंतिम आकडा ७ वर स्थिरावला असून, या निवडणुकीत तिरंगी संघर्ष होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. परंपरागत गट, नव्या चेहऱ्यांची एन्ट्री आणि सामाजिक–राजकीय समीकरणांमुळे या वेळीची लढत अधिकच प्रतिष्ठेची होणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उरलेले ७ उमेदवार
▪️शामराज विजय रमेश
▪️गंगणे विनोद विलासराव
▪️पवार अविनाश राजेंद्र
▪️कदम दत्तात्रय देविदास
▪️सिरसट संदीप अरुण
▪️मगर अमर अशोकराव
▪️गिरीगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी, सोमवार गिरी मठ, तुळजापूर.

या उमेदवारांमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत प्रचारयुद्ध रंगात आले आहे. मतदारांचे मन वळवण्यासाठी शीर्ष नेत्यांच्या भेटीगाठी, सामुदायिक संपर्क, घरदार प्रचाराला वेग आला आहे.
नगरसेवक पदावरही चुरस – एकूण ५५ उमेदवार रिंगणात प्रभागनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे –
▪️प्रभाग क्र. १ : ६ उमेदवार
▪️प्रभाग क्र. २ : ८ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ३ : ४ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ४ : ५ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ५ : ६ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ६ : ५ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ७ : ४ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ८ : ७ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ९ : ६ उमेदवार
▪️प्रभाग क्र. १० : ४ उमेदवार
▪️प्रभाग क्र. ११ : ८ उमेदवार
▪️नगराध्यक्ष पद : ७ उमेदवार
प्रत्येक प्रभागात स्थानिक समीकरणे, राजकीय गटबाजी आणि व्यक्तिगत लोकप्रियतेचा तगडा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे या सर्व ६३ जणांमध्ये चुरस वाढली आहे.
मतदानाची उत्सुकता शिगेला
दि. २ डिसेंबर रोजी मतदान, तर निकालानंतरची रंगतदार मोजणी तुळजापूरकरांसाठी रोमांचकारी ठरणार आहे. कोणत्या गटाचे समीकरण जुळते, कोणत्या उमेदवाराला जनतेचा कौल मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूरची ही निवडणूक केवळ स्थानिक नसून अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत गुंतलेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडी आणखी वेगाने घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.



