Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगराध्यक्षपदावर “लाडक्या बहिणी”ची चर्चा जोरात;अजित दादांची दिवाळी भेट ठरणार का नगराध्यक्षपद ?

अजित दादांची दिवाळी भेट ठरणार का नगराध्यक्षपद ?

0 6 7 8 4 1

तुळजापूर नगराध्यक्षपदावर “लाडक्या बहिणी”ची चर्चा जोरात;अजित दादांची दिवाळी भेट ठरणार का नगराध्यक्षपद ?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांच्या पत्नी सौ. मिराताई श्रीकृष्ण सूर्यवंशी या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उप मुख्यमंत्रीमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आपल्या “लाडक्या सहकाऱ्याच्या पत्नीवर म्हणजेच लाडक्या बहिणीवर” विश्वास दाखवत तुळजापूरच्या नगराध्यक्षपदाची दिवाळी भेट देण्याची तयारी दाखवल्याच्या चर्चेने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून तुळजापूरमध्ये ‘घड्याळ’अर्थात अजित पवार गटाचीच सत्ता टिकून आहे. त्यामुळे शहराच्या जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह दृढपणे कोरले गेले आहे. अजित दादांनी अर्थमंत्री म्हणून लाडक्या बहिणीला प्रतीमहिना पंधराशे रुपयांची भेट दिल्याच्या चर्चेमुळेही राजकीय रंग चढला आहे.
तुळजापूरच्या महिलांच्या मनात आणि मतदारांच्या हृदयात “घड्याळ” रुजले आहे. “नगराध्यक्षपद राष्ट्रवादीचाच खात्रीशीर विजय!”असा सूर शहरभर उमटत आहे.
राजकारणात उत्सुकता,जनतेत चर्चा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडधड- तुळजापूरचा नगराध्यक्ष कोण होणार, हेच आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे!

घड्याळ तेच वेळ नवी…
राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या उत्साहाने राजकीय रणभूमीत पाऊल टाकले आहे; पक्षाचे धोरण, नेतृत्व आणि जनसंपर्काची पद्धत बदलत असून, स्थानिक समस्या सोडवण्यावर विशेष भर देत आहे. समाजातील विविध गटांना एकत्र करून विकासाचा नवा मार्ग दाखवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवल आहे. शाश्वत अर्थव्यवस्था, शिक्षण आणि आरोग्यावर ठोस कार्यक्रम राबविण्याचे प्रामाणिकपणे वचन सौ.मिराताई श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी तुळजापूरनामा न्युजशी बोलताना दिले आहे.
4/5 - (4 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे