Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

प्रभाग ४ मध्ये “रोचकरी– साळुंक” जोडीची जोरदार लाट; प्रचार रॅलीत उसळला जनसमर्थनाचा जणू महापूर!

प्रभाग ४ मध्ये विकासाची घोषणा; रोचकरी– साळुंके जोडीच्या रॅलीत मतदारांचा उसळता उत्साह!

0 7 6 4 8 6

प्रभाग ४ मध्ये “रोचकरी– साळुंक” जोडीची जोरदार लाट; प्रचार रॅलीत उसळला जनसमर्थनाचा जणू महापूर!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ४ मध्ये “रोचकरी– साळुंके” जोडीचा जोरदार प्रभाव जाणवत आहे. उमेदवार रोचकरी सुनील संभाजीराव आणि साळुंके श्वेता वैभव यांच्या प्रचाररॅलीला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी स्वतः पुढाकार घेत भव्य रॅली काढली.

 

रॅलीदरम्यान प्रभाग ४ मधील असंख्य मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोचकरी– साळुंके जोडीवर विश्वासाचा ठसा उमटवला. गल्लीबोळातून काढण्यात आलेल्या या रॅलीला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असून “बदलाची वेळ आलीच!” असा सूर मतदारांमध्ये ऐकू येत आहे.

रोचकरी यांच्या शांत कार्यशैलीला आणि श्वेता साळुंके यांच्या संपर्कक्षमतेला विनोद पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाची साथ लाभल्याने ही तिकडी प्रभागात वेगाने लोकप्रिय होत असल्याचं चित्र दिसत आहे.

सोशल मीडियासह चौकातील चर्चेतही रोचकरी– साळुंके जोडीच्या प्रचंड जनसंपर्काचीच चर्चा रंगत असून, प्रभाग ४ मध्ये बदलाची ठोस चाहूल अधिक दृढ होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे