Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मंगरूळमध्ये युवकाची निर्घृण हत्या; डोक्यात जड वस्तूने वार, मृतदेह फरपटत नेल्याचा संशय

पुलाजवळ आढळला मृतदेह; परिसरात खळबळ नियोजनपूर्वक खूनाचा अंदाज, एक संशयित ताब्यात फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी; तपासाला वेग

0 7 6 4 8 6

मंगरूळमध्ये युवकाची निर्घृण हत्या; डोक्यात जड वस्तूने वार, मृतदेह फरपटत नेल्याचा संशय

▪️पुलाजवळ आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

▪️नियोजनपूर्वक खूनाचा अंदाज, एक संशयित ताब्यात

▪️फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी; तपासाला वेग

तुळजापूर : तालुक्यातील मंगरूळ परिसरात ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.माहितीनुसार, कृष्णा आनंद साठे (वय ३६, रा. मंगरूळ) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर मंगरूळपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरील पुलाजवळ आढळून आला. सकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून साठे यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या पाहणीत मृतदेह सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर फरपटत नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, ही हत्या नियोजनपूर्वक केल्याचा संशय बळावला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे,बीट अंमलदार महादेव राऊत,केदार वाघुळकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी पंचनामा करून तपासाला वेग दिला आहे.दरम्यान, तपासासाठी फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.हत्येमागील नेमके कारण, इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच मृतदेह दूरवर का नेण्यात आला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

▪️ठळक मुद्दे :

३६ वर्षीय युवकाची डोक्यात वार करून हत्या मृतदेह पुलाजवळ सापडला, फरपटत नेल्याचा संशय एक संशयित ताब्यात; चौकशी सुरू तुळजापूर तालुक्यात भीतीचे वातावरण

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे