Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

स्वतःला पोलीस म्हणत हजारो रुपयाची लूट ;धाराशिव शहरात गुन्हा दाखल!

स्वतःला पोलीस म्हणत हजारो रुपयाची लूट ;धाराशिव शहरात गुन्हा दाखल!

0 6 7 8 4 1

स्वतःला पोलीस म्हणत ४० हजार रुपयाची लूट ;धाराशिव शहरात गुन्हा दाखल!

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी फसवणुकीने लंपास केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात घडली असून या प्रकरणी अज्ञात दोन व्यक्तींवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभुलिंग प्रतयाप्पा राजुरे (वय ६२ वर्षे, रा. गणेश नगर, झेंडा क्र. ०२, धाराशिव) हे दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एस.टी. गॅरेजसमोरील साठे चौक परिसरात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी “आम्ही पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे” असे सांगत त्यांना थांबवले.

यानंतर त्यातील एका इसमाने फिर्यादींच्या खांद्यावर हात ठेवत “तुमच्या हातातील अंगठी दाखवा, चौकशीसाठी पाहिजे” असे सांगून त्यांच्या हातातील सुमारे ५ ग्रॅम वजनाची, अंदाजे ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर “तुमची अंगठी खिशात ठेवली आहे” असे सांगून दोघेही इसम पसार झाले.

या प्रकारामुळे गंडा झाल्याचे लक्षात येताच राजुरे यांनी तत्काळ धाराशिव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या फसवणूक प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे स्वतःला पोलीस म्हणून ओळख देणाऱ्या व्यक्तींची शंका आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे