तुळजापूर : नेताजी नगरमध्ये नव्याने उभारलेल्या मारुती मंदिराचा कलशारोहन सोहळा २६ ऑक्टोबरला
तुळजापूर : नेताजी नगरमध्ये नव्याने उभारलेल्या मारुती मंदिराचा कलशारोहन सोहळा २६ ऑक्टोबरला
तुळजापूर : नेताजी नगरमध्ये नव्याने उभारलेल्या मारुती मंदिराचा कलशारोहन सोहळा २६ ऑक्टोबरला
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर (खुर्द) रोडवरील नेताजी नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री मारुती मंदिराचा कलशारोहन सोहळा रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या भक्तीभावाने पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या धार्मिक सोहळ्याचे शुभहस्ते प्रतिष्ठित संतांच्या हस्ते पार पडणार असून, महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत तुकोजी बुवा महाराज, महंत हमरोजी बुवा महाराज, महंत इच्छागिरी महाराज तसेच महंत व्यकंटअरण्य महाराज यांच्या पवित्र उपस्थितीने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची लाभणार आहे.

सोहळ्याची सुरुवात सकाळी १० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. श्री भागवताचार्य पांडुरंग महाराज रेड्डी यांच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता कलशारोहन विधी संपन्न होईल.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.




