ब्रेकिंगमहाराष्ट्र
दूषित पाणी व अस्वच्छतेवरून तुळजापूरात संताप; उपोषणाच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाचे ‘सर्व काही गोल गोल’ म्हणणे
नगरसेवकांच्या आंदोलनाला कमी लेखण्याचा आरोप; नागरिकांच्या ४०० तक्रारी

0
6
7
8
4
1
दूषित पाणी व अस्वच्छतेवरून तुळजापूरात संताप; उपोषणाच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाचे ‘सर्व काही गोल गोल’ म्हणणे
नगरसेवकांच्या आंदोलनाला कमी लेखण्याचा आरोप; नागरिकांच्या ४०० तक्रारी
तुळजापूर : शहरातील दूषित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या प्रश्नावरून तुळजापूरमध्ये वातावरण तापले असताना, नगरपरिषद प्रशासनाने ‘स्थिती नियंत्रणात’ असल्याचा दावा केल्याने वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ व नागरिकांनी जाहीर केलेल्या सामूहिक लक्षणिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नगरपरिषदेकडून दिलेल्या पत्रानुसार, शहरात एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याला पिवळसर रंग येण्याच्या तक्रारीनंतर तात्काळ उपाययोजना केल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित विभागाने तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याचे सांगत सध्या स्वच्छ पाणीपुरवठा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांत नागरिकांना अद्याप दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी कायम असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.जवळपास शहरातील नागरिकाने पिण्याच्या पाणी व स्वच्छतेच्या दुरावस्थाबाबत 400 तक्रारी एकाच दिवशी दिल्या आहेत.स्वच्छतेबाबतही कामे सुरू असल्याचे सांगत, कंत्राटदारांवर देखरेख वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढिग, अस्वच्छ रस्ते आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ‘कागदी कारभारावर’ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, नगरपरिषदेकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी नगरसेवक व नागरिक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात तुळजापूरमध्ये प्रशासनाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.उपोषण कर्ते गटनेते अमोल कुतवळ,आनंद जगताप,रंजीत इंगळे,अक्षय परमेश्वर – कदम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
0
6
7
8
4
1



