Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर : वरिष्ठ तहसीलदारांनाच ब्लॅकमेल! १५ लाखांच्या खंडणीप्रकरणी मंडळ अधिकारी व वकिलावर गुन्हा !

0 7 6 4 9 7

तुळजापूर : वरिष्ठ तहसीलदारांनाच ब्लॅकमेल! १५ लाखांच्या खंडणीप्रकरणी मंडळ अधिकारी व वकिलावर गुन्हा !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरात महसूल विभागाला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या वरिष्ठांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत तब्बल १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके यांच्याविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनंतर महसूल खात्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कर्जाच्या थकबाकीपासून खंडणीपर्यंत… नेमकं काय घडलं?

तहसीलदार अरविंद बोळंगे हे तुळजापूर येथे कार्यरत असताना त्यांच्या अंतर्गत आरळी बु. येथील मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल प्रतिनियुक्तीवर काम पाहत होते. बहिरमल यांनी घेतलेल्या SBI क्रेडिट कार्डची तब्बल ४ लाखांची थकबाकी होती. वसुलीकरिता बँकेकडून येणाऱ्या फोनसाठी त्यांनी ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून थेट तहसीलदार बोळंगे यांचा नंबर दिला. त्यानंतर निवडणुकीच्या कामाच्या काळात तहसीलदारांना बँकेतून सतत फोन येऊ लागले.

यासंदर्भात बोळंगे यांनी बहिरमल यांना जाब विचारल्यावर बहिरमल यांनी उलट धाराशिवच्या आनंदनगर पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली.

तक्रार मागे घ्यायची असेल तर… खंडणी द्या!

या तक्रारीची दहशत दाखवत मंडळ अधिकारी बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके यांनी तहसीलदारांकडे तडजोडीच्या नावाखाली प्रचंड रकमेची मागणी सुरू केली.

सुरुवातीला १५ लाख रुपये
नंतर तडजोड म्हणून १० लाख रुपये माफीनामा

शेवटी “माफीनामा नाही दिला तरी चालेल, पण २ लाख रुपये द्यावे लागतील” अशी मागणी WhatsApp कॉलवरून करण्यात आली.

घरी येऊन बँक खाते दिले!

६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता बहिरमल आणि बोडके तहसीलदारांच्या घरी गेले. तिथेच त्यांनी शहाजी अभिमान कांबळे यांच्या नावाचे बँक खाते क्रमांक WhatsApp वर पाठवत,”पैसे दिले तर प्रकरण मिटेल,नाहीतर त्रास वाढेल” असा जवळजवळ दबावच आणला.

या सततच्या मानसिक छळाला कंटाळून तहसीलदार बोळंगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

गुन्हा दाखल – BNS कलम 308(3)

तहसीलदारांच्या फिर्यादीवरून मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्यावर BNS कलम ३०८(३) (खंडणी) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून
तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे यांच्याकडे आहे.

महसूल खात्यात खळबळ

एका मंडळ अधिकाऱ्याने थेट आपल्या तहसीलदारांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी मागितल्याच्या या संवेदनशील प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आनंदनगर पोलीस ठाण्यातल्या शिवीगाळ तक्रारीनंतर मंडळ अधिकारी बहिरमल यांची तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयात बदलीही करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे