Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर शहर मोकाट कुत्र्यांच्या जाचातून मुक्त; नगरसेवक आनंद जगताप यांच्या पुढाकाराने ठोस कारवाई

तुळजापूर शहर मोकाट कुत्र्यांच्या जाचातून मुक्त; नगरसेवक आनंद जगताप यांच्या पुढाकाराने ठोस कारवाई

0 6 7 8 4 1

तुळजापूर शहर मोकाट कुत्र्यांच्या जाचातून मुक्त; नगरसेवक आनंद जगताप यांच्या पुढाकाराने ठोस कारवाई

तुळजापूर : माणसाप्रमाणेच या भूतलावर पशुपक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. अनेक नागरिक प्राण्यांवर प्रेम करतात व त्यांची काळजीही घेतात. मात्र, मानवी आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची बाब आहे. तुळजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यांच्या हल्ल्यांत अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, काही भागांतून जाताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर सक्त भूमिका घेत रस्त्यांवरून त्यांना हटवून निवारागृहांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत होते. अशा वेळी महाविकास आघाडीचे नूतन नगरसेवक आनंद जगताप यांनी पुढाकार घेत दि. २३ फेब्रुवारी रोजी स्वखर्चातून आणि स्वतःच्या देखरेखीखाली शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेतली.या मोहिमेत शहरातील विविध भागांतून मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना निवारागृहांमध्ये हलवण्यात आले. विशेष म्हणजे ही कारवाई कोणतीही राजकीय घोषणा न करता थेट कृतीतून राबवण्यात आली, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणात नगर परिषदेची भूमिका अपुरी ठरल्याची चर्चा असताना, नगरसेवक आनंद जगताप यांनी जबाबदारी स्वीकारत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे तुळजापूर शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे