प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाचे जुने निष्ठावंत नेते शिवाजीराव बोधले यांचा दावा-“जुन्यां कार्यकर्त्यांना न्याय मिळावा”
प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाचे जुने निष्ठावंत नेते शिवाजीराव बोधले यांचा दावा-"जुन्यां कार्यकर्त्यांना न्याय मिळावा"
प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाचे जुने निष्ठावंत नेते शिवाजीराव बोधले यांचा दावा-“जुन्यां कार्यकर्त्यांना न्याय मिळावा”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव बोधले यांचा दावा पुन्हा एकदा पुढे आला आहे. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारासाठी पक्षासाठी काम केले होते. या वेळी त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देत पक्षाने बोधले यांनी त्यांच्या पत्नी सौ. सुदर्शनी शिवाजीराव बोधले यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

सौ. सुदर्शनी बोधले यांनी प्रभागातील साळुंके गल्ली, मंकावती गल्ली, कासार गल्ली परिसरात उल्लेखनीय सामाजिक कार्य केले असून, नागरिकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. बोधले दांपत्याने पक्ष निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यांची जपणूक करत अनेक वर्ष पक्षाच्या प्रत्येक स्तरावर योगदान दिले आहे.

शिवाजीराव बोधले यांनी बुथप्रमुख म्हणून पक्षाला ५१% मतदान प्रत्येक निवडणुकीत मिळवून दिले, बुथवर २७१ पक्ष सदस्य नोंदवले, तसेच पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. शिराढोण येथे राहून त्यांनी पक्षाचे ध्येय-धोरण जनतेपर्यंत पोहोचवले, जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि ‘मन की बात’ कार्यक्रमाचे नियमित आयोजन केले.
बोधले यांनी पक्षाच्या सर्व बैठकींना उपस्थित राहून कामाचा नीट अभ्यास केला आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रभागातील नागरिकांनीही त्यांना समर्थन दिले आहे.भाजपच्या वतीने प्रभाग क्र. ४ मध्ये जुन्या कार्यकर्त्यांमधून एकाला तरी संधी मिळावी, अशी एकमुख मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीराव बोधले यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे उमेदवारीसाठी विनंती केली आहे.




