Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव भाजप कार्यालयात “विकास नेतृत्वाचा” जयघोष ! नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिटू गंगणे यांचा भव्य सत्कार; तुळजापूरच्या विकासाला नवी दिशा !

0 7 6 4 8 6

धाराशिव भाजप कार्यालयात “विकास नेतृत्वाचा” जयघोष ! नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिटू गंगणे यांचा भव्य सत्कार; तुळजापूरच्या विकासाला नवी दिशा !

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगर परिषदेच्या राजकारणात विकासाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिटू गंगणे यांचा धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन, भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भव्य आणि सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामुळे तुळजापूरच्या विकासाबाबतची अपेक्षा आणि विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.या कार्यक्रमात नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे,धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. नेहाताई राहुल काकडे तसेच कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ.सुनंदा कापसे यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. मात्र, तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाची धुरा समर्थपणे हाती घेतलेल्या नगराध्यक्ष गंगणे यांच्या नेतृत्वाकडे उपस्थितांचे विशेष लक्ष केंद्रित झाले होते.या सत्कारप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच नगराध्यक्ष गंगणे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट अपेक्षा व्यक्त केल्या.पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत तुळजापूरमध्ये ठोस, जनतेला थेट लाभ देणारे निर्णय घेतले जातील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पारदर्शक,गतिमान आणि विकासाभिमुख प्रशासन हीच नगराध्यक्ष गंगणे यांच्या नेतृत्वाची ओळख ठरेल,असे मत यावेळी व्यक्त झाले.नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिटू गंगणे यांच्या माध्यमातून तुळजापूर नगर परिषदेत लोकाभिमुख कारभार, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि शहराच्या विकासासाठी धाडसी निर्णय घेतले जातील, असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.विशेष म्हणजे, तुळजापूरच्या विकासाचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन करण्यात विशाल छत्रे यांनी मोलाची भूमिका बजावली असून,ते या घडामोडीतील “मेन प्लेयर” ठरल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.“तुळजापूरचा विकास थांबणार नाही,तर वेग घेईल”असा संदेश देणाऱ्या या भव्य सत्कार सोहळ्याने शहराच्या राजकीय आणि विकासात्मक वातावरणात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे