Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

फिर्यादीने १२ लाख ५० हजारांची फसवणूक;बेकरी मशिन देतो म्हणत आरोपीचा विश्वास संपादन करून घेतले पैसे

0 6 7 8 4 1

१२ लाख ५० हजारांची फसवणूक;बेकरी मशिन देतो म्हणत आरोपीचा विश्वास संपादन करून घेतले पैसे

धाराशिव : प्रतिनिधी

आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी बिजली मेहतो, रा. सोलापूर ता. जि. सोलापूर याने फिर्यादी भाग्यश्री विठ्ठल लांडगे (वय २६, रा. पाडोळी, ता. जि. धाराशिव) यांचा विश्वास संपादन करून त्यांची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत युनियन बँक, धाराशिव येथे आरोपीने फिर्यादीस बेकरी मशीन तसेच आवश्यक साहित्य आणून देतो असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून भाग्यश्री लांडगे यांनी आरटीजीएस आणि फोनपेच्या माध्यमातून आरोपीस १२,५०,००० रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने कोणत्याही प्रकारची मशिनरी न देता संपर्क तोडला.या प्रकरणी भाग्यश्री लांडगे यांनी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे