Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून अमर मगर यांची अधिकृत उमेदवारी

“तुळजापूर शहराचा विकासाचा नवा चेहरा-अमर मगर!”

0 7 6 4 9 7

तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून अमर मगर यांची अधिकृत उमेदवारी

“तुळजापूर शहराचा विकासाचा नवा चेहरा-अमर मगर!”

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

सलग चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून, शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरशीची लढत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून “स्वच्छ चारित्र्य,मजबूत नेतृत्व” या घोषवाक्याखाली अमर मगर यांना नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही घोषणा करण्यात आली असून, शहरात नवचैतन्याची लहर निर्माण झाली आहे.

१५ वर्षांची जनसेवेची परंपरा :

अमर मगर हे तुळजापूर नगरपरिषदेत सलग पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने काम केले. सर्व समाजघटकांशी जवळीक ठेवत त्यांनी विकासाच्या प्रत्येक आघाडीवर आपली छाप पाडली आहे.

सौ.धरर्ती चिनमय मगर यांचीही उमेदवारी

महाविकास आघाडीकडून प्रभाग क्र. १० मधून सौ.धरर्ती चिनमय मगर यांचीही उमेदवार निश्चित केली आहे.१० नोव्हेंबर रोजी दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.

शहरात चर्चा :”विकासाचा नवा चेहरा अमर मगर” यांच्या उमेदवार निश्चित झाल्यानंतर तुळजापूर शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. नागरिकांमध्ये “विकासाचा नवा चेहरा-अमर मगर” यांची चर्चा रंगली असून, स्वच्छ प्रतिमा आणि जनसेवेचा सातत्याने ध्यास घेतलेले मगर हे नगराध्यक्षपदासाठी बलाढ्य दावेदार म्हणून पुढे आले आहेत. आगामी काही दिवसांत महाविकास आघाडीचा प्रचार वेग घेणार असून, शहरात नव्या नेतृत्वाचा उदय घडणार,असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे