ब्रेकिंगमहाराष्ट्र
“जय जगदंब” कॉफीटेबल पुस्तकाचा तुळजापूरात भव्य प्रकाशन सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्सवी वातावरण
“जय जगदंब” कॉफीटेबल पुस्तकाचा तुळजापूरात भव्य प्रकाशन सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्सवी वातावरण

0
7
6
4
8
7
“जय जगदंब” कॉफीटेबल पुस्तकाचा तुळजापूरात भव्य प्रकाशन सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्सवी वातावरण
तुळजापूर : उपाध्ये श्रीकृष्ण दीक्षित यांनी लिहिलेल्या व संकलित केलेल्या “जय जगदंब” या कॉफीटेबल पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थान राणाजगजितसिंह पाटील यांनी भूषविले.या कार्यक्रमाला आमदार सतीश चव्हाण, आमदार अमिताताई चव्हाण, जितेश अंतापूरकर, श्रीजयाताई चव्हाण, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार हनुमंत पाटील, नांदेडच्या महापौर कविता मुळे, तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, उप नगराध्यक्ष रोचकरी, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, गटनेते औदुंबर कदम , विशाल कोंढो, विनीत कोंढोयांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाची सुरुवात तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मराठी गीताने करण्यात आली.प्रास्ताविक करताना आयोजक अमरनाथ राजूरकर यांनी सांगितले की, “जय जगदंब” हे पुस्तक व्यावसायिक हेतू न ठेवता धार्मिक माहितीचा अमूल्य ठेवा म्हणून प्रकाशित करण्यात आले आहे.

या पुस्तकामुळे जुन्या व नव्या पिढीला तुळजाभवानीचे महात्म्य सविस्तर समजण्यास मदत होणार आहे.अध्यक्षीय भाषणात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या प्रकाशन सोहळ्याला “कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप” असल्याचे सांगत, हे पुस्तक देवीभक्तांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल,असा विश्वास व्यक्त केला.उद्घाटनपर भाषणात खासदार अशोक चव्हाण यांनी श्रीकृष्ण दीक्षित यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, कोविड काळाचा त्यांनी सदुपयोग करून हे पुस्तक लिहिले.या पुस्तकात तुळजाभवानीची सखोल आराधना, दुर्मिळ छायाचित्रे तसेच सरदार वल्लभभाई पटेल व निजाम यांचा ऐतिहासिक फोटो समाविष्ट असून तो संशोधकांसाठी महत्त्वाचा ठरेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमरनाथ राजूरकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी लक्ष्मीकांत आचार्य, समीर देशपांडे, आशुतोष राजूरकर, विशाल कोंडो, विनीत कोंडो, कुंदन कोंडो तसेच दीक्षित यांच्या कन्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी पुस्तकाचे मुद्रक किरण कुलकर्णी व वैभव कोशाळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
0
7
6
4
8
7



