Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नगराध्यक्षपदाची शर्यत रंगतदार! विनोद ‘पिटू’ गंगणेच्या एन्ट्रीने निवडणूका तापल्या;तुळजापूररांच्या चर्चांना उधाण !

नगरपरिषद सदस्य पदासाठी २९ उमेदवारांचे एकूण ५६ अर्ज दाखल

0 6 7 8 4 1

नगराध्यक्षपदाची शर्यत रंगतदार!

विनोद ‘पिटू’ गंगणेच्या एन्ट्रीने निवडणूका तापल्या;तुळजापूररांच्या चर्चांना उधाण !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची उलटी गणती सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. नगराध्यक्षपदासाठी अद्याप अर्जांचा अभाव असतानाच, १५ नोव्हेंबरला विनोद उर्फे ‘पिटू’ गंगणे यांनी नामनिर्देशन दाखल करून रंगात भर घातली आहे.

यापूर्वी ‘हुकमी एक्का कोण?’ या प्रश्नावर शहरभर चर्चेला उधाण आले होते. परंतु गंगणे यांच्या अर्जानंतर निवडणूक समीकरणांचे पारडे हलू लागले असून आगामी दोन दिवसांत आणखी कोणते दिग्गज रिंगणात उतरतील, याकडे तुळजापूरचे लक्ष खिळले आहे. अर्ज भरण्याचा १७ नोव्हेंबर हा अंतिम दिवस असल्याने शेवटच्या क्षणी चित्र पालटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

पक्षांच्या बैठका, गोपनीय खलबते, चर्चासत्रे वेगाने सुरू असून ‘क्षणोक्षणी चित्र बदलणारी’ अशी ही नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंजक होण्याची चिन्हे आहेत. कोण ठरेल तुळजापूर करांचा ‘हुकमी एक्का’? यावर संपूर्ण शहराचे डोळे खिळले आहेत.

▪️नामनिर्देशनाची आकडेवारी (दिनांक : १५ नोव्हेंबर २०२५)

नगराध्यक्षपदासाठी २ अर्ज प्राप्त

विनोद गंगणे – भाजप
विजय शामराज – अपक्ष

▪️नगरपरिषद सदस्य पदासाठी
२९ उमेदवारांचे एकूण ५६ अर्ज दाखल

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे