ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव रोडवर अनधिकृत बांधकामाचा कहर! नियम धाब्यावर बसवून ‘मलबा कॉम्प्लेक्स’वर धोकादायक बांधकाम सुरू -सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव
धाराशिव रोडवर अनधिकृत बांधकामाचा कहर! नियम धाब्यावर बसवून ‘मलबा कॉम्प्लेक्स’वर धोकादायक बांधकाम सुरू -सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव

0
7
6
4
8
6
धाराशिव रोडवर अनधिकृत बांधकामाचा कहर! नियम धाब्यावर बसवून ‘मलबा कॉम्प्लेक्स’वर धोकादायक बांधकाम सुरू -सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव
तुळजापूर : शहरातील धाराशिव रोडलगत असलेल्या मलबा कॉम्प्लेक्सच्या वरती कोणताही अधिकृत बांधकाम परवाना नसताना धोकादायक पद्धतीने बांधकाम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर (खुर्द) येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार अर्ज सादर केला आहे. संबंधित बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असून भविष्यात पाणी निचरा, पर्यावरणीय प्रदूषण व सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता सर्रास बांधकाम सुरू केले असून प्रशासनाच्या नियमांना जुमानले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
▪️नगरपरिषद प्रशासन झोपेत?
▪️अनधिकृत बांधकामांना कोणाचा पाठींबा?
अर्जदाराने नगरपरिषदेकडे या बांधकामाची तात्काळ शहानिशा करून परवाना नसल्यास सुरू असलेले व उभारलेले बांधकाम पाडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी एका लकी निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव यांचे स्वाक्षरी आहेत
0
7
6
4
8
6