ब्रेकिंगमहाराष्ट्र
आरोग्य संपन्न कृतीदलात पत्रकारांचा सहभाग; तालुकास्तरावर जनजागृतीला नवी दिशा
तुळजापूर तालुक्यासाठी पत्रकार श्रीकांत कदम,धाराशिवसाठी प्रमोद राऊत,

0
7
6
4
8
6
आरोग्य संपन्न कृतीदलात पत्रकारांचा सहभाग; तालुकास्तरावर जनजागृतीला नवी दिशा
तुळजापूर तालुक्यासाठी पत्रकार श्रीकांत कदम,धाराशिवसाठी प्रमोद राऊत,
धाराशिव : नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी कामकाज आणि जनजागृतीसाठी प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात येणाऱ्या “तालुका आरोग्य संपन्न कृतीदल” समितीत पत्रकार प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने तालुकानिहाय पत्रकारांचे नामनिर्देशन जाहीर केले असून संबंधित समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.या समितीमुळे आरोग्य योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच प्रशासन आणि समाज यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होणार असल्याचे मानले जात आहे.तुळजापूर तालुक्यासाठी श्रीकांत कदम (दै. पुण्यनगरी), धाराशिवसाठी प्रमोद राऊत, उमरग्यासाठी अविनाश काळे, कळंबसाठी बालाजी आडसूळ यांच्यासह विविध तालुक्यांतील पत्रकारांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान, आरोग्यविषयक मोहिमा आणि शासकीय उपक्रम अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पत्रकारांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

0
7
6
4
8
6



