Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरच्या राजकारणात मलबा परिवाराची विक्राळ गर्जना! गंगणे यांच्या दमदार एन्ट्रीने विरोधकांची झोप उडाली – निवडणुकीआधीच “गुलाल”उधळला!

मलबा परिवाराचा एकच शब्द -निवडून आणणारच!

0 7 6 4 9 7

तुळजापूरच्या राजकारणात मलबा परिवाराची विक्राळ गर्जना!

गंगणे यांच्या दमदार एन्ट्रीने विरोधकांची झोप उडाली – निवडणुकीआधीच “गुलाल”उधळला!

तुळजापूर : प्रतिनिधी

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असतानाच मलबा परिवाराने केलेली एकच चाल संपूर्ण राजकीय मैदान हलवून गेली आहे. तुळजापूरच्या नगराध्यक्ष पदासाठी विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी अखेर अधिकृतपणे रणांगणात दमदार पाऊल टाकताच, विरोधकांच्या तळपायाची झालर उडाल्याचं चित्र राजकीय गलियार्‍यात स्पष्ट दिसत आहे.

▪️मलबा परिवाराचा एकच शब्द -निवडून आणणारच!

विनोद गंगणे यांच्या उमेदवारीला मिळालेला मलबा परिवाराचा तुफानी पाठिंबा या निवडणुकीचं समीकरणच बदलून टाकतोय.
“दि.३ डिसेंबरचा निकाल काय… आम्ही तर त्याआधीच गुलाल उधळतोय!” असा विजय-घोष मलबा परिवाराने करताच विरोधकांच्या चेहऱ्यावरची रंगत गायब झाल्याचं बोललं जात आहे.

▪️छत्रे, क्षिरसागर, हंगरकर यांचा भव्य सत्कार – परिसर दणाणून गेला!

विनोद गंगणे यांच्या सोबत अगदी सावलीसारखा खंबीर उभा असणारा सखा विशाल छत्रे,तसेच प्रभाग क्र.२ मधील उमेदवार दिनेश क्षिरसागर आणि जनसंपर्कआत आघाडीवर असलेले अमर हंगरकर यांच्या जंगी सत्काराने वातावरण क्षणभर मेळाव्याची आठवण करून देतं होतं.

भव्य पुष्पगुच्छ, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि “मलबा परिवार जिंदाबाद! विनोद पिटू गंगणे नगराध्यक्ष होणारच!”या गगनभेदी घोषणांनी तुळजापूरचा परिसर अक्षरशः थरारला.

▪️विरोधकांचे यंत्रणेचे गणित ढासळले?

राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा – “ही लढत आता एकतर्फी होत चालली का?”

मलबा परिवाराचा एकसंध, प्रचंड आणि निश्चयी पाठिंबा पाहता
विरोधकांच्या तंबूत ‘धडकी गोंधळ’ अशी दुहेरी अवस्था निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

▪️विनोद गंगणे यांच्या एन्ट्रीनं समीकरणं पालटली!

नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात त्यांच्या प्रवेशानं तुळजापूरच्या राजकारणात नव्या शक्ती-समीकरणांची निर्मिती झाली असून त्यांच्या कॅम्पमध्ये उमटणारा उत्साह आणि जनसामान्यांचा वाढता कल विरोधकांच्या डोळ्यापुढे ‘३ डिसेंबरची झलक’ दाखवत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

▪️शेवटचा सवाल – लढत राहील का? की इतिहास घडणार?

मतदारांच्या चर्चेत एकच मुद्दा गाजतोय “ही लढाई आता निर्णयाच्या आधीच ठरून गेली काय?” तुळजापूरच्या राजकीय पटावर सध्या मलबा परिवाराच्या वतीने गंगणे यांच्या जोरदार उभारणीने विरोधकांचं गणित कोलमडताना स्पष्ट दिसतंय.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे