Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

अवैध मद्यविक्रीवर बेंबळी पोलिसांची धडक कारवाई — साडेतीन लाखांचा दारूचा साठा जप्त!

अवैध मद्यविक्रीवर बेंबळी पोलिसांची धडक कारवाई — साडेतीन लाखांचा दारूचा साठा जप्त!

0 7 6 4 9 7

अवैध मद्यविक्रीवर बेंबळी पोलिसांची धडक कारवाई — साडेतीन लाखांचा दारूचा साठा जप्त!

धाराशिव : प्रतिनिधी

अवैध मद्यविक्रीला आळा बसावा यासाठी बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ₹3,26,980 किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 2.10 वाजता, रोमा हॉटेल समोर, धाराशिव येथे संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली. तपासादरम्यान आरोपी प्रदीप इंद्रसिंग भट (वय 27, रा. गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा अवैध विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारू जवळ बाळगून असल्याचे समोर आले.

या कारवाईत पोलिसांनी सर्व दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून, महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65(ई) अन्वये बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, बेंबळी पोलिसांचा अवैध मद्यविक्रीविरोधी मोहीमेला अधिक गती मिळाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे