Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

शिवसेनेचा गड राखण्यास सज्ज – गणेश लक्ष्मण कांबळे यांची जिल्हा परिषदेसाठी तयारी!

0 7 6 5 1 2

शिवसेनेचा गड राखण्यास सज्ज – गणेश लक्ष्मण कांबळे यांची जिल्हा परिषदेसाठी तयारी!

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा भगवा अधिक मजबूत करण्यासाठी शिवसैनिक गणेश लक्ष्मण कांबळे हे सज्ज झाले आहेत. गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून आणि पाच वर्षे उपसरपंचपदावर कार्यरत राहून त्यांनी लोकसेवेची नाळ थेट जनतेशी जोडली आहे. पक्षनिष्ठा आणि जनतेतील विश्वास या दोन बळावर कांबळे आज शहापूर मतदारसंघातील मजबूत दावेदार ठरत आहेत.पडत्या काळातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निष्ठेचा आदर्श घालून दिला. सत्तेच्या मोहात न पडता पक्ष आणि जनतेसाठी काम करण्याचा त्यांचा संकल्प कायम राहिला आहे. ग्रामविकास, शेतकरी प्रश्न, पाणीपुरवठा आणि युवकांना रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर त्यांनी नेहमीच आवाज उठविला आहे.तुळजापूर तालुक्यातील केशेगावसह परिसरातील नागरिकांमध्ये गणेश कांबळे हे “आपला माणूस” म्हणून ओळखले जातात. साधा, जमिनीवरचा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली असून जनतेच्या सुख-दुःखात ते सतत सहभागी राहिले आहेत. विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर मतदारसंघात शिवसेनेचे वातावरण चांगले आहे. या पार्श्वभूमीवर जर शिवसेनेने गणेश कांबळे यांच्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली, तर ते निश्चितच गड राखून शिवसेनेचा भगवा अधिक तेजाने फडकवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे. शहापूर मध्ये शिवसेनेचे जुने कार्यकर्ते, तरुण वर्ग आणि ग्रामविकासासाठी झटणारे समाजहितैषी नागरिक यांच्या एकत्र पाठिंब्यामुळे कांबळे यांचे नाव पुढे येत आहे. “पक्ष आणि जनतेसाठी झटत राहणे हीच खरी शिवसेना संस्कृती आहे” असे सांगत कांबळे यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.शिवसेनेने संधी दिल्यास शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा भगव्या झेंड्याखालीच राहणार, यात शंका नाही. असे तुळजापूरनामा न्युजशी बोलताना सांगितले.

5/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे