Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

0 6 7 8 4 1

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

तुळजापूर : प्रतिनिधी

भरदिवसा व्यावसायिकाला लुटणाऱ्या आरोपीस अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गाठ घालून जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले असून या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 406/2025 अंतर्गत भा.दं.वि. कलम 304, 3(5) BNS प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथक गस्तीदरम्यान पोस्टे तुळजापूर हद्दीत होते. त्याचवेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले.

पुढील चौकशीत आरोपीचे नाव मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे (वय 30, रा. वेताळ नगर, तुळजापूर) असे असून त्याने आपल्या साथीदारासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील रेडमी कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला आहे.

आरोपीस पुढील तपासासाठी तुळजापूर पोलीस ठाण्याकडे रिपोर्टसह सुपूर्द करण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोह. राहुल नाईकवाडी, समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे, योगेश कोळी, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पो.अं. सुर्यवंशी व भोसले यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेने आपली कार्यक्षम आणि तत्पर प्रतिमा अधिक मजबूत केली आहे. निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अल्पावधीत आरोपीला गाठ घालून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे