आरळी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
आरळी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
आरळी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सन 1998 दहावी बॅचच्या वर्गमित्रांनी गेट टू गेदरच्या माध्यमातून एकत्रित येत दैनंदिन जीवनप्रवसातून वेळ काढत गुरुजींच्या सानिध्यात सुख दुःखाचा संवाद करत मनसोक्त आनंद घेतला.
शालेय जिवन पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत असताना किंवा वैवाहिक जिवन प्रवासातुन वेळ काढत पुन्हा 25 वर्षांनंतर एकत्र येणं तस अवघडच असत,पण नियोजन करत गेट टू गेदर घडवून आणत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्यांनी शिक्षणाबरोबर जगण्याचा मार्ग दाखवला अशा गुरूंजींसोबत गप्पांची मैफिल खूपच मजेत सम्पन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी शालेय सहकारी स्वर्गीय वर्गमित्र लक्ष्मीकांत गायकवाड आणि शशिकांत घोडके यांना आदरांजली वाहली. या स्नेहमेळाव्यास माजी मुख्याध्यापक तुकाराम जाधव,महादेव गायकवाड, सर्जेराव वाघमारे,सुरेश कुलकर्णी,रवींद्र माने, सदाशिव सरवदे आदी शिक्षक उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्याला माहेरवाशिन माजी विद्यार्थिनी बरोबर माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.एका वर्गात बाकावर बसून आणि ग्राऊंडवर पेटी परेड करत शालेय आठवणी जागृत केल्या. स्नेहभोजनानंतर उपस्थित सर्वांना आई श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा आठवण भेट म्हणून देण्यात आली.



