Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

एनएच–५२ वर गोवंश तस्करीचा पर्दाफाश; पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई

एनएच–५२ वर गोवंश तस्करीचा पर्दाफाश; पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई

0 7 6 4 9 7

एनएच–५२ वर गोवंश तस्करीचा पर्दाफाश; पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सतर्क पथकाने एनएच–५२ महामार्गावर मध्यरात्री गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आणत निर्दयी कत्तलीसाठी नेली जाणारी पाच गोवंशीय जनावरे वाचवली. पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.दि. २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ००.४० वाजता, एनएच–५२ रोडवरील जम्मू पंजाबी धाब्याजवळ संशयास्पद पिकअप वाहन क्रमांक एमएच २३ एडी ०७५२ थांबवण्यात आले. तपासणीदरम्यान त्यामध्ये चार जर्सी गाय व एक कारवड, अंदाजे १ लाख ३० हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे, कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी आरोपी रजाक मौला फकीर (वय ५२, रा. शिवशंकर नगर, भुम ता. भुम जि. धाराशिव) याच्याविरुद्ध प्राण्यांस क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ड) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ), ५(ब), ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या कडक नेतृत्वामुळे गोवंश तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला असून, नागरिकांनीही अशा गैरकृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे