Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

लोहारा पोलीस ठाण्यातील चार जणांवर निलंबनाची कारवाई!

भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल; पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचा आदेश..

0 7 6 4 8 7

लोहारा पोलीस ठाण्यातील चार जणांवर निलंबनाची कारवाई!

भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल; पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचा आदेश..

लोहारा : प्रतिनिधी

लोहारा पोलीस ठाण्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर दि.१३ नोव्होंबर रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३२१/२०२५, कलम ७, ७(अ),१२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत दाखल प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.निलंबितांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे, सपोफौ/५८ निवृत्ती बळीराम बोळके, पोलीस अमंलदार/ १३५ आकाश मधुकर भोसले, आणि पोलीस नाईक/१५९५ अर्जुन शिवाजी तिघाडे यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, पुढील चौकशी सुरू असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे