Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार – जनसेवक अमोल कुतवळ यांचा ठाम सहभाग. 

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट!

0 7 6 4 8 6

धाराशिव जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार – जनसेवक अमोल कुतवळ यांचा ठाम सहभाग.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आता रणशिंग फुंकले आहे. जिल्हाध्यक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. ३१ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे झालेल्या भव्य आढावा बैठकीत “काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, प्रदेश सचिव डॉ. अस्मिता शहापूरकर, तालुकाध्यक्ष रामदादा आलुरे, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप भोकरे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तात्यासाहेब शिंदे, शहबाज काझी, उमेशराजे निंबाळकर आदींसह जनसेवक अमोल कोतवळ यांची उत्साही उपस्थिती लक्षणीय ठरली.

बैठकीत पक्ष संघटन बळकटीसाठी सखोल चर्चा झाली. यावेळी तुळजापूर तालुका काँग्रेस संघटनेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोपाळ रघुनाथ गोरे,युवक सरचिटणीस ईश्वर पारप्पा राजमाने,युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस श्रीधर कदम,
तालुका सरचिटणीस : दीपक संपतराव देशमुख,किसान काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रशांत अभिमान शिंदे.

या प्रसंगी जनसेवक अमोल कुतवळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षात नवउत्साह आणि नवचैतन्य निर्माण करण्याचे आवाहन केले.

▪️“गावागावात जाऊन जनतेशी थेट संवाद साधा,काँग्रेसच्या विचारधारेचा दीप पुन्हा प्रज्वलित करा,”असे प्रभावी आवाहन जनसेवक कुतवळ यांनी कार्यकर्त्यांना केले.
जनसेवक अमोल कुतवळ त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि जनसंपर्कक्षमतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दृश्य संपूर्ण बैठकीत दिसून आले.बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अमोल कोतवळ यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत,
▪️“जनतेच्या मनात काँग्रेस आणि अमोल कुतवळ यांचे नाते हे विश्वासाचे प्रतीक आहे,”असे मत व्यक्त केले.
धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी अमोल कोतवळ यांची भूमिका निर्णायक ठरणार,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकजूट, आत्मविश्वास आणि नेतृत्वावरचा विश्वास पाहता,आगामी निवडणुकीत काँग्रेस विजयाचा बिगुल वाजवणार, यात शंका नाही. अमोल कुतवळ यांनी “तुळजापूरनामा न्युजशी” बोलताना सांगितले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे