Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

खडकीतून यमा मटोर सायक गायब; तामलवाडी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल

खडकीतील विशाल शिरसावर यांची एक लाख तीस हजाराची दुचाकी रात्रोरात लंपास

0 7 6 5 0 5

खडकीतून यमा मटोर सायक गायब; तामलवाडी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल

खडकीतील विशाल शिरसावर यांची एक लाख तीस हजाराची दुचाकी रात्रोरात लंपास

तामलवाडी : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील तरुणाची तब्बल 1 लाख 30 हजार किमतीची यमाहा एमटी-15 ही मोटरसायकल घरासमोरूनच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल किसन शिरसावर (वय 19, रा. खडकी, ता. तुळजापूर) यांच्या मालकीची यमाहा एमटी-15 कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल (क्र. एमएच-25 बीई-6344) ही दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजेपासून ते 11 ऑक्टोबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

या घटनेची फिर्याद स्वतः विशाल शिरसावर यांनी 13 ऑक्टोबर रोजी तामलवाडी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून भा.दं.सं. कलम 379 अन्वये (मालमत्तेविरुद्ध गुन्हा) गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सहाय्यक निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात चोरीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे