Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कायद्याचा खून करून अटक’ ; भूम पोलिसांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे धडक तक्रार

बोगस अटक मेमो तयार करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा दावा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

0 7 6 4 8 6

कायद्याचा खून करून अटक’ ; भूम पोलिसांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे धडक तक्रार

धाराशिव : भूम पोलीस ठाण्याच्या कथित मनमानी आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी सविस्तर निवेदन सादर केले आहे.निवेदनात भूम येथील सुवर्ण व्यावसायिक तथा स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत गोल्ड व्हॅल्युअर ऋषिकेश राजकुमार वेदपाठक यांना चोरीच्या प्रकरणात वैयक्तिक आकसातून अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटक केली असून संपूर्ण कारवाईत कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, मूळ गुन्हा हा साध्या चोरीचा असताना अटक नोटीसमध्ये मारहाण व गंभीर दुखापतीचा उल्लेख करून अटकेचे कारण अधिक गंभीर दाखविण्यात आले. यामुळे न्यायालय व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.याशिवाय, एफआयआर नोंदविणे, वैद्यकीय तपासणी आणि अटकेच्या नोंदींमध्ये वेळेचा गंभीर तफावत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अटक नोंदविण्यापूर्वीच वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याने कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत ऋषिकेश वेदपाठक यांचा मोबाईल फोन कोणताही अधिकृत पंचनामा अथवा जप्ती मेमो न करता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये वैयक्तिक तसेच बँकेशी संबंधित व्यावसायिक माहिती असल्याने डेटा सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच तपासात कोणताही ठोस पुरावा नसल्यास ऋषिकेश वेदपाठक यांना संबंधित गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती पोलीस महानिरीक्षक, गृहमंत्री तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे